धर्मतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माबद्दल अनेक अनमोल विचार प्रकट केले आहेत, जे आज सुद्धा प्रासंगिक आहेत. बाबासाहेबांचे धार्मिक विचार (Dr Babasaheb Ambedkar quotes on religion in Marathi) आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आणि बहुआयामी विद्वान होते. ते धर्मतज्ज्ञ म्हणून देखील विख्यात आहेत. त्यांनी तब्बल 35 वर्ष जगातील सर्व प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास केला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धार्मिक होते, नास्तिक होते आणि धर्मनिरपेक्ष सुद्धा होते. तसेच ते धार्मिक नेते आणि धर्म चिकित्सक वा धर्माभ्यासक सुद्धा होते. अशा या महान धर्म पंडिताने ‘धर्म’ अर्थात ‘रिलिजन’ या संकल्पनेबद्दल अनेक विचार प्रकट केले आहेत, जे विचार या लेखामध्ये संकलित केलेले आहेत.
बाबासाहेबांचे धार्मिक विचार
बाबासाहेबांचे धार्मिक विचार खालीलप्रमाणे आहेत जे प्रामुख्याने ‘धर्म’ या संकल्पनेच्या संदर्भात आहेत.
#1 लोक आणि त्यांचे धर्म सामाजिक नैतिकतेच्या आधारावर सामाजिक मानकांनुसार तपासले गेले पाहिजे. जर लोकांच्या हितासाठी धर्म आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक अनावश्यक ठरेल.
#2 स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणाऱ्या धर्मावर माझा विश्वास आहे.
#3 धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.
#4 माणूस हा धर्माकरिता नसून धर्म हा माणसाकरिता आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण
#5 माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू ‘बुद्ध’ होत. माझे दुसरे गुरु ‘कबीर’ आणि तिसरे गुरु म्हणजे ‘ज्योतिबा फुले’ होत… माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. पहिले दैवत ‘विद्या’, दुसरे दैवत ‘स्वाभिमान’, आणि तिसरे दैवत म्हणजे ‘शील’ होय. (मुंबई, २८ ऑक्टोबर १९५४)

#6 भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाहू इच्छित नाही. प्रथम हिंदी [भारतीय], नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीयाच्या पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. (मुंबई, १ एप्रिल १९३८)
#7 पुढल्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वार्तांवर विश्वास न ठेवता या जन्मी व याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन, मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्थापित करून घ्यावा व हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापातून मुक्त करावे. (मुंबई, २ फेब्रुवारी १९२९)
#8 माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे – स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरू ‘भगवान बुद्ध’ यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे. (नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर १९५४)
#9 जर आपल्याला अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपवले पाहिजे.
#10 हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल. (मुंबई, १९२७)
Dr Ambedkar quotes on Religion in Marathi
#11 भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
#12 आज भारतीय दोन भिन्न विचारसरणींद्वारे संचालित होत आहेत. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे त्यांचे राजकीय आदर्श स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचे प्रतिपादन करतात, परंतु त्यांच्या धर्मात निहित सामाजिक आदर्श हे नाकारतात.
#13 विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.
#14 धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार होय. Ambedkar quotes on religion in Marathi
#15 भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल ती किंवा विभूति-पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. (संविधान सभा, दिल्ली, २५ नोव्हेंबर १९४९)
#16 अस्पृश्यतेची प्रचलित गुलामगिरी जगातील इतर सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भीषण असून, एकट्या हिंदू समाजाच्या अगर धर्माच्या मुखावरीलच तो काळाकुट्ट कलंक नसून, अखिल मानवधर्माला व माणुसकीला लांच्छन आहे. आपण हिंदू समाजाचे अभिन्न असे घटक आहोत म्हणून हिंदूच्या प्रत्येक धार्मिक संस्थेत व मंदिरात प्रवेश करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. (अहमदाबाद, २८ जून १९३१)
#17 “मानवजातीच्या प्रगतीसाठी धर्म ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कार्ल मार्क्सच्या लिखाणामुळे एक पंथ निर्माण झाला, हे मला माहीत आहे. त्यांच्या पंथानुसार, धर्म म्हणजे काहीही नाही. त्यांच्यासाठी धर्म महत्त्वाचा नाही. त्यांना सकाळचा नाश्ता – ब्रेड, मलई, लोणी, चिकन लेग इ. मिळाले; त्यांना निवांत झोप मिळाली, त्यांना चित्रपट पाहायला मिळाले की संपले सर्व, हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. मी त्या मताचा नाही.”
#18 हिंदू धर्मात विवेक, तर्क आणि स्वतंत्र विचार यांच्या विकासाला वाव नाही.
#19 मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन मुक्त नाही, जरी तो साखळदंडात नसला तरी तो गुलाम आहे, स्वतंत्र व्यक्ती नाही. ज्याचे मन मुक्त नाही, जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे आणि स्वतंत्र मनुष्य नाही. ज्याचे मन जिवंत असूनही मुक्त नाही, तो मेल्यासारखाच आहे. मनस्वातंत्र्य हा एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.
#30 जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 130 सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 75 प्रेरणादायी विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मावरील 50 विचार (हिंदी)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शहीद भगतसिंग विषयी विचार
- महाराष्ट्रातील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती; जाणून घ्या डॉ आंबेडकरांचे स्थान
- बाबासाहेब आंबेडकरांचे विचार – मराठी विकिपीडिया
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- 25+ मराठी बौद्ध कलाकार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- भारतात बौद्ध लोकसंख्या नेमकी आहे तरी किती?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
You are doing well.most of information available.thanku so much