Most viewed Personality on Marathi Wikipedia : ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक views असणाऱ्यांच्या देशातील प्रभावी व्यक्तिंची यादी… ज्यात पहिला क्रमांक लागतो तो छ. शिवाजी महाराज यांचा… तर दुसऱ्या क्रमांकावर येतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मात्र उर्वरित 18 लोकप्रिय व्यक्तींमध्ये कोणा-कोणाला स्थान मिळाले आहे? हे जाणून घेणे ही रंजक अणि महितीपर आहे… – सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
मराठी विकीवरील तिसऱ्या क्रमांकाचे नाव जाणून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल! मराठी विकीवरील प्रसिद्ध व्यक्तीशिवाय इंग्रजी विकिपीडिया वरील २० लोकप्रिय व्यक्तिंची माहिती सुद्धा या लेखात शेवटी दिलेली आहे.
2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया‘ वर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या पूर्ण यादी…
फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील जगभरातील लोकप्रिय व्यक्तींविषयी आपण अनेकदा ऐकलंय. सर्वाधिक फॉलोअर्स असणार्या लोकांचा नेटकऱ्यांवर मोठा प्रभाव असतो.
अशातच ‘विकिपीडिया’ हा व्यापक माहितीच्या आदान-प्रदानाचं एक माध्यम बनलंय. तेथे असंख्य लोकांकडून विविध गोष्टींबद्दल वाचलं जातं, प्रभावी आणि प्रसिद्ध व्यक्तींबद्दलही येथे विपुल माहिती उपलब्ध असते, आणि वाचक त्याचा लाभ घेत असतात. त्याचमुळे आपल्या सोशल मिडीयाच्या जगात विकिपीडियाचा प्रभाव वाढलेला दिसून येतोय. अशावेळी विकिपीडियावर सर्वात जास्त प्रभावी व्यक्तिमत्त्व कोण आहे, म्हणजेच सर्वात जास्त कोणाचा विकिपीडिया लेख वाचला जातो? सर्वाधिक लोकप्रियता कोणाची आहे? नेटकऱ्यांवर आणि वाचकांवर सर्वाधिक प्रभाव कुणाचा आहे? हे जाणून घेणंही यामुळे महत्त्वाचं ठरतं.
- विकिपीडिया : जगातील टॉप 30 सर्वात प्रभावशाली भारतीय व्यक्तींची यादी; बुद्ध अव्वल तर PM मोदी सातवे
- नेहरू की आंबेडकर : Wikipedia वर कोण ‘जास्त’ लोकप्रिय आहे? बघा, दोघांचे pageviews
विकिपीडिया म्हटलं तर अनेकांना इंग्लिश विकिपीडिया वाटतो, पण तसं नाही. विकिपीडिया हा जगभरातील एकूण 325 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे, आणि यापैकीच इंग्लिश विकिपीडिया, हिन्दी विकिपीडिया, मराठी विकिपीडिया, तमिळ विकिपीडिया, जर्मन विकिपीडिया ह्या काही विकिपीडियाच्या आवृत्ती आहेत. आपण येथे केवळ मराठी विकिपीडियाचा विचार करत आहोत. मराठी विकिपीडियावर 80 हजार पेक्षा अधिक लेख आहेत.
मराठी ‘विकिपीडिया’वर सर्वाधिक वाचकसंख्या अर्थात ‘views’ असणाऱ्यांच्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमांक लागतो तो शिवाजी महाराज यांचा… दुसऱ्या क्रमांकावर आहेत आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर … बाबासाहेब आंबेडकर यांच्या विकिपीडिया पेजला जवळ जवळ 6 लाख वाचकसंख्या आहे.
विकिपीडियावर तिसऱ्या क्रमांकावर कुणी मराठी व्यक्ती नाही तर एक गुजराती व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी होय.
टॉप 20 व्यक्ती व्यक्तींची यादी
वर्ष 2021 च्या मराठी विकिपीडियावर सर्वाधिक व्यूज (वाचकसंख्या) असणाऱ्या पहिल्या 20 व्यक्तींची यादी.
- शिवाजी महाराज : 6,03,699
- बाबासाहेब आंबेडकर : 5,95,665
- महात्मा गांधी : 2,90,811
- सावित्रीबाई फुले : 2,50,876
- ज्ञानेश्वर : 2,00,667
- महात्मा फुले : 1,98,811
- ए.पी.जे. अब्दुल कलाम : 1,92,596
- शाहू महाराज : 1,58,511
- संभाजी भोसले : 1,49,952
- संत तुकाराम : 1,33,331
- गौतम बुद्ध : 1,31,893
- अण्णा भाऊ साठे : 1,28,016
- सचिन तेंडुलकर : 1,23,370
- लोकमान्य टिळक : 1,22,852
- गाडगे महाराज : 1,20,639
- विनायक दामोदर सावरकर : 1,18,248
- स्वामी विवेकानंद : 1,14,333
- नामदेव : 1,12,431
- जिजाबाई शहाजी भोसले : 1,06,525
- अहिल्याबाई होळकर : 1,05,788
टीप: क्लिओपात्रा या लेखाला 3,96,662 वाचकसंख्या अथवा व्हुज मिळाले असल्याचे दिसते. सॅमसंग अँड्रॉइड स्मार्टफोन व्हॉईस कमांड क्लियोपेट्राचा विकिपीडिया लेख उघडण्याचे सुचवतो. हे एक लोकप्रिय साधन असल्याने, बहुतांश views नकळत घडतात. क्लिओपात्रा लेखाला मिळालेली वाचकसंख्या फसवी असल्याने येथे हा लेख समाविष्ट करण्यात आला नाही. पुढच्या 2022 वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारे या लेखाला याप्रकारे मोठ्या प्रमाणात व्युज मिळाले आहेत.
20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट असलेले महात्मा गांधी, डॉ. कलाम, गौतम बुद्ध, आणि स्वामी विवेकानंद ह्या चार व्यक्ती अ-मराठी (non-marathi) आहेत.
विनायक दामोदर सावरकर यांचा पहिल्यांदाच मराठी विकिपीडियाच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे. 2016 ते 2020 या प्रत्येक वर्षाच्या लोकप्रिय व्यक्तींमध्ये ते समाविष्ट नव्हते.
14वा सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या सूचीत समाविष्ट झालेला एकमेव हयात व्यक्ती आहे.
भोसले घराण्यातील चार व्यक्तींचा समावेश या लेखात झालेला आहे – छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि राजमाता जिजाबाई. तसेच महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांचा सुद्धा दरवर्षी लोकप्रिय व्यक्तींमध्ये समावेश होत असतो.
सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वी वर्षनिहाय 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मधील top 20 लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत.
Top 10 most popular people on English Wikipedia of 2021
इंग्रजी विकिपीडियावर, इलोन मस्क हे “२०२१ चे सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती” ठरले आहेत, त्यांचा लेख तब्बल 2 कोटी 53 लाख 53 हजार 057 वेळा वाचला गेला आहे.
2021 च्या इंग्रजी विकिपीडियावरील शीर्ष 10 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत :
- Elon Musk : 25,353,057
- Elizabeth II : 24,763,417
- Cristiano Ronaldo : 19,486,268
- Prince Philip, Duke of Edinburgh : 18,432,710
- Joe Biden : 17,371,970
- Donald Trump : 16,742,725
- Lionel Messi : 13,272,917
- Tom Brady : 12,538,472
- Charles, Prince of Wales : 11,754,551
- Kamala Harris : 11,091,273
हे ही वाचलंत का?
- धम्म भारत वरील मराठी लेख
- मराठी विकिपीडिया विषयी 30 रंजक तथ्य | Interesting facts about Marathi Wikipedia
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी (अभिनेते आणि गायक) – Buddhist Celebrities in India
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)