मराठी विकिपीडिया हा मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचा माहितीस्त्रोत आहे. 2024 मध्ये मराठी विकिपीडियावर कोणते चरित्रलेख सर्वाधिक वाचले गेले, यावरून लोकांच्या अभिरुचीची दिशा लक्षात येते. या यादीत ऐतिहासिक, सामाजिक आणि आधुनिक काळातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

2024 वर्षातील मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचले गेलेले चरित्रलेख
मराठी विकिपीडिया हा जगभरातील मराठी भाषिकांसाठी माहितीचा महत्त्वाचा स्रोत आहे. 2024 या वर्षात मराठी विकिपीडियावरील टॉप 20 सर्वाधिक वाचले गेलेले चरित्रलेख कोणते आहेत, हे जाणून घेणे रंजक ठरेल. या लेखांच्या वाचकसंख्येच्या आधारे मराठी वाचकवर्गातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे ओळखता येतात.
विकिपीडियावरील लोकप्रियतेचा निकष
सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या आधारे त्यांची लोकप्रियता मोजली जाते. त्याचप्रमाणे, विकिपीडियावरील लेख किती वेळा वाचले जातात, यावरून त्या व्यक्तीविषयीची जनसामान्यांमधील उत्सुकता आणि प्रभाव समजतो. विकिपीडिया केवळ माहितीचा स्रोत नसून जनमानसाच्या अभिरुचीचे प्रतिबिंबही आहे.
- हेही पाहा : महाराष्ट्रातील टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्ती (हिंदी)
मराठी विकिपीडियाची महत्त्वाची भूमिका
मराठी विकिपीडिया हा विकिपीडियाच्या 325+ आवृत्त्यांपैकी एक आहे. भारतीय भाषांमध्ये लेखसंख्येनुसार मराठी विकिपीडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर 99,000 पेक्षा अधिक लेख आहेत, जे मराठी वाचक मोठ्या प्रमाणावर वाचत असतात.
मराठी विकिपीडियावरील टॉप 20 चरित्रलेख (2024)
2024 वर्षामधील मराठी विकिपीडियावर 1,00,000 पेक्षा जास्त वेळा वाचल्या गेलेल्या चरित्र लेखांची यादी खालीलप्रमाणे आहे.
रँक | लेख | वाचकसंख्या | बदल | ||
---|---|---|---|---|---|
1 | 10,54,147 | ![]() |
|||
2 | 5,19,548 | ![]() |
|||
3 | 2,56,271 | ![]() |
|||
4 | 2,21,921 | ![]() |
|||
5 | 2,20,697 | ![]() |
|||
6 | 2,05,441 | ![]() |
|||
7 | 1,98,870 | ![]() |
|||
8 | 1,93,787 | ![]() |
|||
9 | 1,91,206 | ![]() |
|||
10 | 1,81,177 | ![]() |
|||
11 | 1,73,053 | * | |||
12 | 1,72,995 | ![]() |
|||
13 | 1,56,265 | ![]() |
|||
14 | 1,32,466 | ![]() |
|||
15 | 1,13,865 | ![]() |
|||
16 | 1,11,133 | * | |||
17 | 1,10,936 | * | |||
18 | 1,10,861 | ![]() |
|||
19 | 1,04,296 | ![]() |
|||
20 | 1,03,704 | * | |||
संदर्भ |
यादीमधील महत्त्वाचे निरीक्षण:
- शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीप्रमाणे पहिल्या दोन स्थानांवर आहेत.
-
2024 या वर्षी पहिल्या दोन लेखांमध्ये तब्बल 5,34,599 वाचकसंख्येचे अंतर आहे. हे अंतर दुसऱ्या क्रमांकावरील लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येहून (5,19,548) अधिक आहे.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या लेखांमध्ये 2,63,277 वाचकसंख्येचे अंतर आहे, जे तिसऱ्या क्रमांकाच्या लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येहून (2,56,271) अधिक आहे.
- जिजाबाई शहाजी भोसले यांच्या लेखाने सर्वाधिक (4) स्थानांची प्रगती केली.
- शाहू महाराजांचा लेख सर्वाधिक (5) स्थानांनी घसरला.
- 2023 च्या तुलनेत गुणरत्न सदावर्ते, वि.वा. शिरवाडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांचे लेख प्रथमच टॉप 20 मध्ये आले आहेत.
- रतन टाटा यांच्या निधनामुळे (9 ऑक्टोबर 2024) त्यांचा विकिपीडिया लेख मोठ्या प्रमाणावर वाचला गेला.
- या यादीत केवळ जिजाबाई आणि सावित्रीबाई फुले या दोन महिलांचा समावेश आहे.
- गुणरत्न सदावर्ते हे या यादीतील एकमेव हयात व्यक्ती आहेत, तर गौतम बुद्ध हे सर्वात प्राचीन व्यक्तिमत्त्व आहेत.
- यादीत एक मुस्लिम, एक पारशी, तीन बौद्ध आणि उर्वरित बहुतांश हिंदू व्यक्ती आहेत.
- सात समाजसुधारक, नऊ शासक किंवा राजकारणी, तीन संत, दोन धार्मिक व्यक्ती आणि एक उद्योगपती यांचा समावेश या यादीत आहे.
मराठी आणि अमराठी व्यक्तिमत्त्वांचे प्रमाण
या यादीतील 16 व्यक्ती महाराष्ट्रातील असून 4 व्यक्ती महाराष्ट्राबाहेरील आहेत:
- महात्मा गांधी
- ए.पी.जे. अब्दुल कलाम
- गौतम बुद्ध
- स्वामी विवेकानंद
क्लिओपात्रा लेखाचा फसवा ट्रॅफिक
क्लिओपात्रा या लेखाला 11,23,465 वाचकसंख्या मिळाली, परंतु स्मार्टफोनच्या व्हॉईस कमांडमुळे हे व्ह्यूज वाढले असल्याचे लक्षात आल्याने या यादीत तो समाविष्ट करण्यात आलेला नाही.
तक्ता : मराठी विकिपीडिया वरील प्रसिद्ध व्यक्ती
मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचले गेलेले 20 लेख
यापूर्वी आपण केवळ चरित्रलेखांचा विचार केला. आता मराठी विकिपीडियावरील एकूण सर्व लेखांचा विचार करून, 2024 या वर्षातील सर्वाधिक वाचले गेलेल्या 20 लेखांची यादी पाहू. खाली लेखाचे नाव आणि त्यासमोर त्या लेखाच्या एकूण views अर्थात वाचकसंख्येचा उल्लेख आहे.
1. शिवाजी महाराज – 10,54,147
2. बाबासाहेब आंबेडकर – 5,19,548
3. गणपती स्तोत्रे – 3,27,956
4. भारताचे संविधान – 3,22,933
5. सावित्रीबाई फुले – 2,56,271
6. नवग्रह स्तोत्र – 2,34,648
7. दिशा – 2,28,116
8. संभाजी भोसले – 2,21,921
9. संत तुकाराम – 2,20,697
10. मराठी भाषा – 2,14,451
11. ज्ञानेश्वर – 2,05,441
12. महात्मा फुले – 1,98,870
13. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२ – 1,95,414
14. महात्मा गांधी – 1,93,787
15. शाहू महाराज – 1,91,206
16. महाराष्ट्र – 1,90,222
17. लोकमान्य टिळक – 1,81,177
18. महाराष्ट्रातील आरक्षण – 1,76,976
19. गुणरत्न सदावर्ते – 1,73,053
20. महाराष्ट्रामधील जिल्हे – 1,73,051
ही यादी दर्शवते की इतिहास, समाजसुधारक, धार्मिक स्तोत्रे आणि महाराष्ट्रासंबंधित माहिती यांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या 20 लेखांमध्ये 11 चरित्रलेखांचा समावेश आहे.
निष्कर्ष
मराठी विकिपीडिया हे मराठी वाचकांसाठी एक महत्त्वाचे माहितीचे व्यासपीठ बनले आहे. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वे आणि समाजसुधारक आजही लोकांच्या विचारांमध्ये आहेत, याचा पुरावा म्हणून ही यादी पाहता येईल. यापूर्वी 2016 ते 2023 या वर्षांसाठी अशाच याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, आणि 2024 च्या यादीनेही वाचकांच्या अभिरुचीचा आढावा घेतला आहे.
मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचल्या गेलेल्या चरित्रलेखांच्या वर्षनिहाय याद्या पाहा : 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.