धम्मज्ञान परीक्षा निकाल – संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांची नावे तुम्ही नक्कीच बघायला हवीत.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीस मानवंदना म्हणून राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स यांनी या परीक्षेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ आणि “धम्म भारत” वेबसाईटवरील निवडक 30 लेख परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणून ठेवण्यात आले होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने 29 ऑक्टोबर 2023 रोजी ही राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा संपन्न झाली. 50 प्रश्न आणि 100 गुण असे या परीक्षेचे स्वरूप होते (उत्तरपत्रिका पहा). दीड हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 11 स्पर्धकांची 14 नोव्हेंबर 2023 रोजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक अंतिम परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारण्यात आले होते (उत्तरपत्रिका पहा).
व्हिडिओ कॉन्फरन्सवरील स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित करण्यात आले. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे B वयोगटातील (सोळा वर्षांवरील) स्पर्धकांसाठी होते तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे A वयोगटातील (सोळा वर्षांखालील) स्पर्धकांसाठी राखीव होते.
धम्मज्ञान परीक्षा निकाल
संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2023 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहे.
प्रथम पारितोषिक विजेते
साक्षी रमेश भालेराव (ठाणे)
बक्षीस स्वरूप –
रोख रक्कम 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक विजेते
अर्श प्रशांत वाघमारे (नागपूर)
बक्षीस स्वरूप –
रोख रक्कम साडे 12 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक विजेते
ऋषिकेश अनिल त्रिभुवन (छ. संभाजीनगर)
बक्षीस स्वरूप –
रोख रक्कम 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते
बक्षीस स्वरूप –
प्रत्येकी – रोख रक्कम 500 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
1. प्रशिक निशिकांत सदार (अकोला)
2. अनमोल रमेश भालेराव (ठाणे)
3. समृद्धी उदयसिंह कांबळे (सातारा)
4. उपेंद्र विजय वनकर (चंद्रपूर)
हे ही बघा
- धम्मज्ञान परीक्षेची उत्तर पत्रिका बघा
- धम्मज्ञान परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
धम्मज्ञान परीक्षा निकाल – परीक्षेचा अंतिम निकाल हा आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी प्रबुद्ध टीव्ही युट्यूब चॅनलवर तसेच या धम्म भारत वेबसाईटवर जाहीर केला आहे.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.
WhatsApp channel
Telegram channel
Facebook page
E-mail – dhammabharat@gmail.com
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.