धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीस आदरांजली म्हणून प्रबुद्ध टीव्हीने धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025 आयोजित केली आहे.

dhammadeeksha gaurav pariksha 2025
धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025

परीक्षेचा उद्देश

बुद्धाब्द 2500 आणि ख्रिस्ताब्द 1956 या ऐतिहासिक वर्षामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात एका महान सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.

ज्या भूमीवर बुद्धांचा प्रकाश हजारो वर्षे प्रसारित झाला, त्याच भूमीवर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून देशाला समतेचा, करुणेचा आणि प्रज्ञेचा धम्म परत दिला. ही घटना भारतभूमीस पावन करणारी ठरली आणि एक नवा इतिहास निर्माण झाला. हे केवळ धार्मिक परिवर्तन नव्हते—हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक युगांतरकारी कार्य होते, ज्यामध्ये त्यांनी भारतीय समाजाच्या मनामनात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला.

याच ऐतिहासिक धम्मक्रांतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीचे संचालक प्रवीण दीपक जामनिक यांच्या संकल्पनेतून “धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025” या राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदिग्दर्शित क्रांतीचा गौरव, बौद्ध धम्माचे अभ्यासात्मक साक्षात्कार आणि त्याचे व्यवहारात आचरण समाजमनात रुजवण्याचा उद्देश आयोजकांचा आहे.


पारितोषिके

10 विजेत्यांना एकूण 41,000 रुपयांची रोख बक्षिसे आणि पारितोषिके देण्यात येतील.

  • प्रथम पारितोषिक: ₹12,500/-

 

  • द्वितीय पारितोषिक: ₹10,000/-

 

  • तृतीय पारितोषिक: ₹7,000/- (10 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)

 

  • चतुर्थ पारितोषिक: ₹5,000/- (दृष्टीहीन, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव)

 

  • पंचम पारितोषिक: ₹3,000/- (महिला स्पर्धकांसाठी राखीव)

 

  • षष्ठम पारितोषिक: ₹1,500/-

 

  • सप्तम पारितोषिक: ₹500/-
  • अष्टम पारितोषिक: ₹500/-
  • नवम पारितोषिक: ₹500/-
  • दशम पारितोषिक: ₹500/-

 

  • सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.

Syllabus Links

परीक्षेचा अभ्यासक्रम

धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025 चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे –

 1️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भ.  बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथातील 2 खंड (30 प्रश्न)
  खालील खंड वाचा (क्लिक करावे) ⇓⇓⇓

 

2️⃣ धम्म भारत संकेतस्थळावरील 7 लेख (10 प्रश्न)
⇒  खालील लेख वाचा (क्लिक करावे) ⇓⇓⇓


परीक्षेची वैशिष्ट्ये:

मुख्य परीक्षा:

तारीख: 14 ऑक्टोबर 2025 (ऑनलाईन)
प्रश्नसंख्या: 40 (MCQ)
एकूण गुण: 200 (प्रत्येक प्रश्नाला 5 गुण)
कालावधी: 45 मिनिटे

 

सराव परीक्षा:

तारीख: 11 ऑक्टोबर 2025 (ऑनलाईन)
प्रश्नसंख्या: 10 (MCQ)
एकूण गुण: 40
कालावधी: 15 मिनिटे

सराव परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी आयोजित केली आहे.

 

महत्त्वाच्या सूचना:

  • परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) नसेल.
  • सर्व (40) प्रश्न सोडवणे बंधनकारक असेल.
  • ही परीक्षा फक्त मराठीतच घेतली जाईल.

 

महत्त्वाच्या तारखा:

  • नाव नोंदणीची सुरुवात: 25 जून 2025
  • नोंदणीची अंतिम तारीख: 8 ऑक्टोबर 2025
  • मुख्य परीक्षा: 14 ऑक्टोबर 2025
  • सराव परीक्षा: 11 ऑक्टोबर 2025
  • निकाल: 30 ऑक्टोबर 2025

 

 

      टीप:

  • वरील तारखा स्थायिक नाहीत. त्यामध्ये बदल होऊ शकतो. अंतिम तारखा परीक्षा होण्याच्या 15 दिवस आधी जाहीर केल्या जातील.
  • सराव व मुख्य परीक्षेनंतर दोन दिवसांत उत्तरतालिका धम्म भारत वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.

नियम व अटी:

धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025 चे नियम खालीलप्रमाणे: 

➡️ परीक्षा पद्धत:

  • परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतली जाईल.
  • परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल.
  • परीक्षार्थीने मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाच्या माध्यमातून परीक्षा द्यावी.

 

➡️ अभ्यास साहित्य व इतर :

परीक्षेचा अभ्यासक्रम (PDF आणि लिंक्स), रोल नंबर, प्रश्नोत्तर पत्रिका, गुणपत्रिका, तसेच मागील परीक्षांच्या प्रश्नोत्तर पत्रिका यांच्या लिंक्स आणि सर्व सूचना प्रबुद्ध टीव्हीच्या WhatsApp चॅनेलवर उपलब्ध करून दिल्या जातील.

 

➡️ वयोमर्यादा:

किमान वय 10 वर्षे. कमाल वयोमर्यादा नाही.

 

➡️ पारितोषिके:

10 यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके दिली जातील. 3रे, 4थे आणि 5वे पारितोषिक हे अनुक्रमे लहान मुले, अपंग (दृष्टीहीन, कर्णबधिर आणि मुकबधिर) आणि महिला यांच्यासाठी राखीव आहेत. (नियम व अटी लागू.) 

 

➡️ परीक्षा लिंक:

  • परीक्षा लिंक सहभागी स्पर्धकाच्या नोंदणीकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवली जाईल.
  • लिंक मिळवण्यासाठी 7447755627 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असणे अनिवार्य आहे. (नंबर सेव्ह न केल्यास लिंक मिळणार नाही.)

 

➡️ पात्रता:

परीक्षा ही महाराष्ट्र राज्यस्तरीय असल्यामुळे फक्त महाराष्ट्रातील रहिवासी स्पर्धकच पात्र राहतील.

 

➡️ समान गुणप्राप्त स्थिती:

एकाहून अधिक स्पर्धकांचे गुण सारखे आल्यास बक्षिसे ठरवण्यासाठी इतर निकष वापरले जातील. अंतिम निर्णय आयोजकांचा असेल.

 

➡️ प्रवेश फी:

परीक्षा शुल्क ₹100/- आहे.

 

➡️ नोंदणी रद्द:

नोंदणीनंतर प्रवेश रद्द करता येणार नाही.

 

➡️ डिजिटल प्रमाणपत्र (E-Certificate):

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळेल.

 

➡️ सराव परीक्षा:

मुख्य परीक्षेपूर्वी सराव परीक्षा घेण्यात येईल. या चाचणीचे गुण अंतिम निकालात विचारात घेतले जाणार नाहीत.

 

➡️ एकच पारितोषिक:

विजेत्या स्पर्धकास केवळ एकच पारितोषिक दिले जाईल (राखीव किंवा अराखीव यांपैकी कोणतेही एक).

 

➡️ मागील स्पर्धेतील विजेते अपात्र:

मागील स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकातील विजेते या वेळेस पारितोषिकासाठी पात्र ठरणार नाहीत, कारण नवीन स्पर्धकांना संधी मिळावी असा उद्देश यामागे आहे.

 

➡️ नियमांचे परिवर्तन:

आयोजकांना कोणतेही नियम बदलण्याचा, नवीन नियम तयार करण्याचा व जुन्या नियमांमध्ये फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार राहील. सर्व स्पर्धकांसाठी हे नियम बंधनकारक राहतील.


नोंदणी कशी कराल?

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी:

WhatsApp वर “Registration Link” असा मेसेज पाठवावा:
7447755627

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या:
PrabuddhaTV.in


WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल


हेही बघा


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!