Last Updated on 13 October 2025 by Sandesh Hiwale
भारतभर शेकडो जातींमध्ये बौद्ध आढळतात, पण या लेखात आपण केवळ महाराष्ट्रातील बौद्ध धर्मातील जाती, त्यांचे वर्गीकरण, लोकसंख्या, सामाजिक ओळख आणि त्यासंबंधित विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत.

बौद्ध धर्मातील जाती: एक विस्तृत विश्लेषण
बौद्ध धर्म हा जातिव्यवस्थेच्या विरोधात असूनही, भारतातील विविध जाती आणि जमातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळून येतात. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), तसेच काही सवर्ण समाजातील (General Category) लोकही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
महाराष्ट्रातील बौद्ध धर्मातील जाती कोणत्या आहेत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि सामान्य प्रवर्गातील बौद्ध समाजाचे वर्गीकरण जाणून घ्या. वाचा सविस्तर माहिती!
हेही पाहा :
- ‘मोफत’ बौद्ध पुस्तके असे मिळवा घरपोच!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्मावरील विचार
- नवबौद्ध म्हणजे काय? व्याख्या आणि तुलनात्मक विश्लेषण!
बौद्ध धर्म आणि जातीव्यवस्था
बौद्ध धर्मात जाती नाहीत, परंतु भारतात बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या लोकांची पूर्वीची जातीय ओळख अद्याप अस्तित्वात आहे. अनेक अनुसूचित जाती (एससी) आणि जमातीतील (एसटी) लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच काही सामान्य प्रवर्गातील (सवर्ण) लोकही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे जातीवर्गीकरण
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या:
महाराष्ट्रातील एकूण 65,31,200 बौद्ध धर्मीयांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे होते:
- एससी बौद्ध (नवबौद्ध) : 52,04,284 (79.68%)
- एसटी बौद्ध (आदिवासी बौद्ध) : 20,798 (0.32%)
- ओबीसी व सामान्य प्रवर्गातील बौद्ध : 13,06,118 (20.00%)
जनगणनेमध्ये सामाजिक गट फक्त अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर असेच तीन प्रकार दिले होते. त्यामुळे ओबीसी आणि अनारक्षित अर्थात सामान्य प्रवर्गातील बौद्धांना “इतर” गटात समाविष्ट करण्यात आले होते.
अनुसूचित जातीमधील बौद्ध:
महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित जाती (एससी) आहेत, त्यापैकी 53 जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले. 2011 मध्ये, अनुसूचित जातीमधील बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 52,04,284 होती, जी राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्येच्या 79.68% होती.
अनुसूचित जमातीमधील बौद्ध:
महाराष्ट्रात 45 अनुसूचित जमाती (एसटी) असून, त्यापैकी 40 जमातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले. अनुसूचित जमातीमधील बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 20,798 होती, जी राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्येच्या अवघी 0.32% होती. (संदर्भ)
याचा अर्थ 90+ अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये बौद्ध समाजाचा समावेश आहे.
ओबीसी आणि सामान्य प्रवर्गातील बौद्ध:
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील ओबीसी व सामान्य प्रवर्गातील बौद्धांची लोकसंख्या 13,06,118 होती, जी एकूण बौद्ध लोकसंख्येच्या 20.00% होती.
ओबीसी (माळी, धनगर, कुणबी, तेली इ.) तसेच काही सवर्ण जातींमध्ये (ब्राह्मण, मराठा, कायस्थ इ.) देखील बौद्ध धर्मीय आढळतात. मात्र, जातनिहाय धर्मगणना नसल्याने त्यांच्या संख्येबाबत अचूक माहिती उपलब्ध नाही.
यापुढे जातनिहाय जनगणना झाल्यास, एससी-एसटीसह ओबीसी (व्हीजेएनटी, एसबीसी सह) आणि सामान्य प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस सह) बौद्धांची संख्याही स्पष्टपणे कळू शकेल.
हेही पाहा :
- महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या किती? जनगणनेतून आकडेवारी समोर
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि बौद्ध लोकसंख्या
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 53 अनुसूचित जातींमध्ये एकूण 52 लाख बौद्ध आढळले. खालील तक्त्यात प्रत्येक अनुसूचित जातीतील बौद्ध लोकसंख्या दिली आहे.
59 अनुसूचित जाती आणि त्यातील बौद्ध लोकसंख्या:
अ.क्र. | अनुसूचीत जाती | बौद्ध लोकसंख्या |
1 | अगेर |
|
2 | अनमुक |
|
3 | आरेमाला |
|
4 | अरवा माला |
|
5 | बहना, बहाना |
|
6 | बाकड, बंट |
|
7 | बलाही, बलाई |
|
8 | बसोर, बुरुद, बांसोर, बांसोडी, बसोड |
|
9 | बेडा जंगम, बुडगा जंगम |
|
10 | बेडर |
|
11 | भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार |
|
12 | भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला |
|
13 | बिंदला |
|
14 | ब्यागारा |
|
15 | चलवादी, चन्नय्या |
|
16 | चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी |
|
17 | डक्कल, डोक्कलवार |
|
18 | ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर |
|
19 | डोम, डुमार |
|
20 | येल्लमलवार, येल्लमलवंडलु |
|
21 | गंडा, गंडी |
|
22 | गरोड, गारी |
|
23 | घासी, घासीया |
|
24 | हल्लीर |
|
25 | हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार |
|
26 | होलार, व्हलार |
|
27 | होलय, होलेर, होलेया, होलिया |
|
28 | कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील तसेच राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील) |
|
29 | कटिया, पथरिया |
|
30 | खंगार, कनेरा, मिरधा |
|
31 | खाटीक, चिकवा, चिकवी |
|
32 | कोलूपूल-वंडलु |
|
33 | कोरी |
|
34 | लिंगडेर |
|
35 | मादगी |
|
36 | मादिगा |
|
37 | महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू |
|
38 | माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर |
|
39 | माला |
|
40 | माला दासरी |
|
41 | माला हन्नाई |
|
42 | माला जंगम |
|
43 | माला मस्ती |
|
44 | माला साले, नेटकानी |
|
45 | माला सन्यासी |
|
46 | मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग |
|
47 | मांग-गारोडी, मांग-गारुडी |
|
48 | मन्ने |
|
49 | मष्टी |
|
50 | मेंघवाल, मेंघवार |
|
51 | मिठा, अय्यलवार |
|
52 | मुक्री |
|
53 | नाडीया, हादी |
|
54 | पासी |
|
55 | सांसी |
|
56 | शेणवा, चेणवा, सेडमा, रावत |
|
57 | सिंधोल्लू, चिंदोल्लू |
|
58 | तिरगार, तिरबंदा |
|
59 | तुरी |
|
|
59 पैकी 53 अनुसूचित जातींमध्ये, म्हणजेच 90% जातींमध्ये, बौद्ध धर्मीय व्यक्ती आढळून आल्या आहेत. या बौद्ध धर्मातील जाती आहेत. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या 1,32,75,898 आहे, त्यापैकी केवळ 52,04,284 (39%) लोक बौद्ध धर्मीय आहेत.
दलित समाजात सर्वाधिक हिंदूंची संख्या असून, बौद्ध दुसऱ्या क्रमांकावर आणि शीख तिसऱ्या स्थानावर आहेत. सुमारे 30 लाख महार लोकांची नोंद ‘हिंदू’ म्हणून झाल्याने, हिंदू दलितांची संख्या अधिक आणि नवबौद्धांची संख्या तुलनेने कमी दिसत आहे. येथे राज्यातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय आकडेवारी पाहा.
हेही पाहा :
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक SC जातीची धर्मनिहाय लोकसंख्या
- बौद्ध धर्माची प्राथमिक माहिती जाणून घ्या
- बौद्ध धर्माचा भारतीय समाज जीवनावरील प्रभाव
महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती आणि बौद्ध लोकसंख्या
महाराष्ट्रात 45 अनुसूचित जमातींपैकी 40 जमातींमध्ये 20,798 बौद्ध आढळले. खालील तक्त्यात अनुसूचित जमातींतील बौद्ध लोकसंख्या दिली आहे.
40 अनुसूचित जमाती आणि त्यातील बौद्ध लोकसंख्या:
क्र. | अनुसूचित जमाती | बौद्ध लोकसंख्या |
1 | आंध | 797 |
2 | बैगा | 17 |
3 | बरडा | 9 |
4 | बावचा, बामचा | 1 |
5 | भैना | 2 |
6 | भारिया भुमिया, भुईंहार भुमिया, पांडो | 7 |
7 | भत्रा | 0 |
8 | भील, भील गरसिया, ढोली भिल्ल, दुंगी भिल्ल, दुंगी ग्रीसिया, मेवासी भिल, रावल भिल, तडवी भील, भागिया, भिलाळा, पावरा, वासव, वसाव | 2,053 |
9 | भुंजिया | 17 |
10 | बिंजवार | 16 |
11 | बिरहुल, बिरहोर | 0 |
12 | [वगळले] | - |
13 | धानका, तडवी, टेटरिया, वाल्वी | 42 |
14 | धनवार | 41 |
15 | धोडिया | 23 |
16 | दुबला, तळविया, हळपटी | 28 |
17 | गामित, गामता, गावीत, मावची, पडवी | 33 |
18 | गोंड, राजगोंद, अराख, र्अराख, आगारिया, असुर, बडी मारिया, बाडा मारिया, भटोला, भीममा, भुता, कोलाभाटा, कोलाभुती, भार, बिझनहोर्न मारिया, छोटा मारिया, दंडमी मारिया, धुरु, धुर्वा, ढोबा, धुलीया, दोराला, गाकी, गट्टा, गत्ती, गाय, गोंड, गोवारी, हिल मारिया, कंद्रा, कालंगा, खटोला, कोटर, कोया, खिरवार, खिरवाडा, कुचा मारिया, कुचकी मारिया, माडिया, मारिया, माना, मनुवार, मगिया, मगिया, मग्या, मुडिया, मुरिया , नागची, नायकपोड, नागवंशी, ओझा, राज, सोनझारी झरेका, थाटिया, थोट्या, वेड मारिया, वेड मारिया | 3,170 |
19 | हलबा, हलबी | 458 |
20 | कमार | 17 |
21 | कथोडी, कातकरी, धोर काठोदी, धोर कथकरी, सोन काठोदी, सोन काटकारी | 270 |
22 | कवर, कंवर, कौर, चेरवा, रथिया, तंवर, छत्री | 40 |
23 | खैरवार | 5 |
24 | खारिया | 9 |
25 | कोकणा, कोकणी, कुकणा | 349 |
26 | कोल | 52 |
27 | कोलाम, मन्नेरवारलु | 207 |
28 | कोळी ढोर, तोकरे कोळी, कोलचा, कोलघा | 230 |
29 | कोळी महादेव, डोंगर कोळी | 3,137 |
30 | कोळी मल्हार | 3,269 |
31 | कोंध, खोंद, कंध | 0 |
32 | कोरकु, बोपची, मौअसी, निहाल, नहुल, बोंधी, बोंडेया | 136 |
33 | कोया, भिने कोया, राजकोया | 0 |
34 | नागेसिया, नागासिया | 4 |
35 | नायकडा, नायका, चोलिवाला नायका, कपाडिया नायका, मोटा नायका, नाना नायका | 26 |
36 | ओरांव, धनगड | 188 |
37 | परधान, पाथरी, सरोती | 312 |
38 | पारधी, अद्विचीन्डचेर, फान्स पारधी, फणसे पारधी, लांगोली पारधी, बहेलिया, बहेल्लिया, चिता पारधी, शिकारी, तकन ताकंकर, तकिया | 674 |
39 | पारजा | 1 |
40 | पटेलिया | 20 |
41 | पोमला | 0 |
42 | राठवा | 4 |
43 | सवर, सवरा | 2 |
44 | ठाकुर, ठाकर, का ठाकूर, का ठाकर, मा ठाकुर, मा ठाकर | 236 |
45 | [वगळले] | - |
46 | वारली | 194 |
47 | विटोलिया, कोटवालिया, बोरोडिया | 1 |
- | Generic Tribes etc. | 4,701 |
एकूण | 20,798 |
45 पैकी 40 अनुसूचित जमातींमध्ये, म्हणजेच 89% जमातींमध्ये, बौद्ध धर्मीय व्यक्ती आढळून आल्या आहेत. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची एकूण लोकसंख्या 1,05,07,000 आहे. त्यापैकी केवळ 20,798 (0.20%) आदिवासी बौद्ध धर्मीय आहेत.
आदिवासी समाजात सर्वाधिक हिंदूंची संख्या आहे, तर मुस्लिम आदिवासी दुसऱ्या क्रमांकावर आणि बौद्ध आदिवासी तिसऱ्या स्थानावर आहेत. बौद्धांपेक्षा थोडेसे कमी ख्रिश्चन आदिवासी आहेत. येथे आदिवासींची धर्मनिहाय आकडेवारी पाहा.
हेही पाहा :
- महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी आणि प्रत्येक ST जमातीची लोकसंख्या
- बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- जगात किती बौद्ध देश आहेत? बौद्ध देशांची नावे आणि यादी पाहा
बौद्ध समाज आणि जातीय ओळख
- काही बौद्ध लोक केवळ ‘बौद्ध’ ही ओळख स्वीकारतात आणि जातीचा उल्लेख करत नाहीत.
- काही बौद्ध लोक धार्मिक ओळख कायम ठेवून त्यांची जातीय ओळखही नोंदवतात, जेणेकरून सामाजिक आणि शैक्षणिक लाभ मिळू शकतील.
- अनुसूचित जाती-जमातीमध्ये आरक्षण असलेल्या बौद्ध समाजातील लोकांना जातीय ओळख राखण्याची गरज वाटते.
- काही अनुसूचित जाती-जमातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळत नाहीत, कारण त्या जातींची लोकसंख्या अत्यंत कमी आहे.
- जातनिहाय धर्मगणना नसल्यामुळे ओबीसी आणि सवर्ण बौद्ध समाजाच्या लोकसंख्येबाबत अचूक माहिती नाही.
हेही पाहा :
- महाराष्ट्रातील विद्यमान 10 बौद्ध आमदार (2024-29)
- बौद्ध समाजाला आरक्षण किती आहे?
- महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असावे आणि किती आहे?
निष्कर्ष:
बौद्ध धर्मातील जाती : बौद्ध धर्मात जाती नाहीत, तरीही सामाजिक परिस्थितीमुळे भारतातील बौद्ध समाज विविध जातींमध्ये विभागलेला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारला गेला आहे, तसेच काही प्रमाणात ओबीसी आणि सवर्ण समाजातील लोकही बौद्ध झाले आहेत. भारतभर पाहता शेकडो जातींमध्ये बौद्ध समाज आहे, मात्र आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांचे अचूक प्रमाण सांगता येत नाही.
वाचकांनो, तुमच्या मते बौद्ध धर्मीयांनी जातीय ओळख ठेवली पाहिजे का? तुमचा अभिप्राय खाली कमेंटमध्ये द्या!
हेही वाचा
- ‘बुद्धजयंती वर्ष’ आणि ‘बौद्ध वर्ष’ यात काय फरक आहे?
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- 40 मराठी बौद्ध कलाकार | Marathi Buddhist Celebrities
- भारतातील बौद्ध गायक आणि गायिकांची यादी
- मानवी जीवनातील दुःख याविषयी बुद्धांचे विचार
- 2024 मध्ये मराठी विकिपीडियावर कोणत्या व्यक्तींचे लेख सर्वाधिक वाचले गेले?
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.