SC, ST, OBC, VJ-NT, SEBC विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत’ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!

Last Updated on 16 September 2025 by Sandesh Hiwale

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC, IBPS, SSC, पोलीस व मिलिटरी अशा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी अगदी मोफत ! मोफत प्रशिक्षणासोबत आकर्षक विद्यावेतनही उपलब्ध आहे. प्रवर्गनिहाय उपलब्ध कोर्सेस पाहण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचावा. 

BARTI forms

(प्रत्येक प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे लागतात, जी खाली दिली आहे.)

महाराष्ट्र सरकारकडून SC, ST, OBC, SBC, VJ-NT, SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणविद्यावेतन देण्यात येणार आहे.

ही योजना बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आर्टी या प्रमुख शासकीय संस्थांमार्फत 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत नामांकित खाजगी संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाईल, आणि प्रशिक्षणार्थींची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test – CET) द्वारे केली जाईल.

CET परीक्षेचा अभ्यासक्रम हा उमेदवाराने निवडलेल्या कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

अर्जाची करण्याची तारीख: 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025

भरलेल्या अर्जाच्या दुरुस्तीची तारीख:  31 ऑगस्ट 2025

परीक्षा कालावधी : 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025


विशेष पात्रता व आवश्यक अटी

  • जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक.
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – दिव्यांगत्वाचा दाखला अनिवार्य.
  • उमेदवार एकापेक्षा अधिक कोर्ससाठी अर्ज करू शकतात.

 

अचूकपणे फॉर्म भरण्यासाठी संपर्क:
WhatsApp: 9822937648

 

प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कोर्सेस आणि अर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची स्वतंत्र यादी खाली दिली आहे.


प्रवर्गानुसार प्रशिक्षणाची माहिती

विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आर्टी या शासकीय संस्थांमार्फत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

तथापि, प्रत्येक संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कोर्सची संख्या वेगवेगळी असून, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रेही प्रवर्गानुसार बदलतात. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना स्वतःच्या प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रांची खात्री करून ठेवावी.

खाली संस्थेनुसार व प्रवर्गानुसार उपलब्ध प्रशिक्षण कोर्सेस आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर यादी दिली आहे.

Free Coaching for Competitive Exams


SC विद्यार्थ्यांसाठी : बार्टी आणि आर्टी

  • बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) – मांग वगळता सर्व अनुसूचित जातींसाठी
  • आर्टी (अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) – केवळ मांग (47) आणि त्यासंबंधित (35 & 48) अनुसूचित जातींसाठी

SC साठी 9 कोर्सेस:

1️⃣| UPSC

2️⃣| MPSC राज्यसेवा

3️⃣| MPSC Combine

4️⃣| MPSC अभियांत्रिकी

5️⃣| MPSC न्यायिक सेवा

6️⃣| IBPS (बँकिंग)

7️⃣| पोलीस भरती

8️⃣| मिलिटरी भरती

9️⃣| SSC CGL

 

आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड
✅ 10वी आणि 12वीचे मार्कशीट
✅ पदवीचे मार्कशीट
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र (तहसीलचे)
✅ जात प्रमाणपत्र
✅ 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र/ पावती (तहसीलचे)


ST विद्यार्थ्यांसाठी : TRTI

  • आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI)

ST साठी 7 कोर्सेस:

1️⃣| UPSC

2️⃣| MPSC राज्यसेवा

3️⃣| MPSC Combine

4️⃣| MPSC अभियांत्रिकी

5️⃣| MPSC न्यायिक सेवा

6️⃣| IBPS (बँकिंग)

7️⃣| SSC CGL

 

आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड
✅ 10वी आणि 12वीचे मार्कशीट
✅ पदवीचे मार्कशीट
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र (तहसीलचे)
✅ जात प्रमाणपत्र
✅ जात वैधता प्रमाणपत्र/ पावती (Caste Validity)
✅ 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र/ पावती (तहसीलचे)


OBC, SBC, VJ-NT विद्यार्थ्यांसाठी : महाज्योती

  • महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती)

OBC, SBC, VJ-NT साठी 3 कोर्सेस:

1️⃣| UPSC

2️⃣| MPSC राज्यसेवा

3️⃣| MPSC Combine

 

आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड
✅ 10वी आणि 12वीचे मार्कशीट
✅ पदवीचे मार्कशीट
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र
✅ जात प्रमाणपत्र
✅ नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र


SEBC विद्यार्थ्यांसाठी : सारथी

  • छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (सारथी) – मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, आणि कुणबी-मराठा विद्यार्थ्यांसाठी

SEBC साठी 6 कोर्सेस:

1️⃣| UPSC

2️⃣| MPSC राज्यसेवा

3️⃣| MPSC अभियांत्रिकी

4️⃣| MPSC न्यायिक सेवा

5️⃣| IBPS (बँकिंग)

6️⃣| SSC CGL

 

आवश्यक कागदपत्रे

✅ आधार कार्ड
✅ 10वी आणि 12वीचे मार्कशीट
✅ पदवीचे मार्कशीट
✅ डोमिसाईल प्रमाणपत्र (तहसील)
✅ जात प्रमाणपत्र
✅ 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र/ पावती किंवा नॉन-क्रीमीलेयर/ पावती


प्रशिक्षणाचा लाभ कसा मिळेल?

प्रशिक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी खालील टप्पे पूर्ण करावे लागतील –

1️⃣ ऑनलाइन अर्ज भरणे – अचूकपणे फॉर्म भरण्यासाठी WhatsApp No. 9822937648 वर मॅसेज करावा; किंवा निर्धारित तारखेपूर्वी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावरून अर्ज भरावा. 

2️⃣ परीक्षा देणे – तुम्ही निवडलेल्या केंद्रावर सामायिक प्रवेश परीक्षा (CET) होईल.

3️⃣ मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणे – परीक्षेनंतर काही दिवसांत निवड यादी जाहीर केली जाईल.

4️⃣ निवड व कागदपत्र पडताळणी – तुमचे नाव यादीत असल्यास संबंधित संस्थेकडून तुम्हाला बोलावले जाईल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

5️⃣ प्रशिक्षण सुरू होणे – कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला निश्चित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश दिला जाईल. येथे तुम्हाला मोफत प्रशिक्षण तसेच निर्धारित विद्यावेतन दिले जाईल.


फॉर्म भरण्यासाठी संपर्क

अचूकपणे फॉर्म भरण्यासाठी संपर्क:
WhatsApp: 9822937648

⚠️ सूचना:

  • योग्य माहितीशिवाय फॉर्म स्वतः भरू नका. चुकीचा फॉर्म भरल्यास संधी हुकू शकते.
  • आम्ही तुमचा फॉर्म अचूक व पूर्ण भरून देऊ.
  • अर्जाची अंतिम तारीख: 30 ऑगस्ट 2025
  • भरलेल्या अर्जाच्या दुरुस्तीची तारीख:  31 ऑगस्ट 2025

हा लेख वाचल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना ही योजना उपयोगी ठरेल. आपण ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास मदत करा.


माहितीसाठी अधिकृत संपर्क:

BARTI CONTACTS


अधिकृत लिंक्स :

फॉर्मची भरण्याची अधिकृत लिंक तुम्हाला धम्म भारत च्या व्हॉट्सॲप चॅनलवर मिळेल. 23 ऑगस्ट 2025 रोजी ती लिंक तिथे शेअर केली आहे.

क्लिक करा ⇓

https://whatsapp.com/channel/0029VaANuq88V0tt616rKn1c


परीक्षा कालावधी : 14 ते 27 सप्टेंबर 2025

Admit Card संदर्भात: बार्टी (BARTI) CET 2025-26 – स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महत्त्वाची सूचना

बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या शासकीय संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

️ परीक्षा कालावधी : 14 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025

UPSC : 14, 15 सप्टेंबर
IBPS : 16 सप्टेंबर
MPSC rajyaseva : 17, 18, 19, 20 सप्टेंबर
MPSC engineering : 17, 18, 19, 20 सप्टेंबर
MPSC group B & C : 20, 21, 23 सप्टेंबर
SSC : 24, 25 सप्टेंबर
Police and Military : 25, 26, 27 सप्टेंबर
MPSC judiciary : 27 सप्टेंबर

 

️ प्रवेशपत्र (Admit Card) संदर्भातील महत्त्वाच्या सूचना :

1️⃣ प्रथम टप्पा – परीक्षेच्या 6 दिवस आधी शहराचे वाटप ऑनलाइन पाहता येईल. (फक्त पाहण्यासाठी उपलब्ध – प्रिंट करता येणार नाही).

2️⃣ द्वितीय टप्पा – परीक्षेच्या 3 दिवस आधी परीक्षा केंद्राची माहिती आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल. हे प्रवेशपत्र प्रिंट करून परीक्षा केंद्रावर सादर करणे बंधनकारक आहे.

 

Required documents during exam

परीक्षेत ‘या’ गोष्टी सोबत ठेवणे अनिवार्य

  1. प्रवेशपत्र (Admit Card) झेरॉक्स
  2. मूळ ओळखपत्र (मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड यांपैकी कोणतेही एक)
  3. मूळ ओळखपत्राची झेरॉक्स
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. दिव्यांग (PWD) उमेदवारासाठी लेखनीक (Scribe) असल्यास त्याचे वैध ओळखपत्र तसेच, उमेदवाराच्या अपंगत्व प्रमाणपत्राची झेरॉक्स

 

उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राची एक छायांकित प्रत, त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावून, वैध फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत परीक्षा केंद्रावर सादर करावी.

(प्रवेशपत्रावर परीक्षेसंबंधी इतर अनेक सूचना दिल्या आहेत त्या सुद्धा उमेदवारांनी वाचून घ्याव्यात.)

  • ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची असेल.
  • प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल.
  • चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही.
  • ऑनलाइन परीक्षेचा प्रश्नपत्रिका द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी) असेल.

 

बार्टी प्रशिक्षणासाठीच्या परीक्षेसंदर्भात अद्यावत माहिती तुम्हाला खालील व्हाट्सअप चॅनलवर मिळेल (चॅनल फॉलो करावे)
https://whatsapp.com/channel/0029VaANuq88V0tt616rKn1c

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!